पवित्र रमजान ईदसाठी ‘जनता कर्फ्यू’चा कालावधी दोन दिवस कमी करण्याची मुस्लिम बांधवांची मागणी..

दिनांक १० मे श्रीगोंदा

श्रीगोंदा शहरासह तालुक्यामध्ये दिनांक ५ मे २०२१ ते १४ मे २०२१ दरम्यान ‘जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान ईद हा सण १४ मे रोजी आहे. या सणाच्या निमित्ताने मुस्लिम समाज बांधवांच्या प्रतिनिधींनी श्रीगोंदयाचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना ‘जनता कर्फ्यू’चा कालावधी दोन दिवसांनी कमी करावा. असे निवेदन सादर केले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

दिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, श्रीगोंदा शहरात दिनांक ५ मे ते १४ मे २०२१ या कालावधीसाठी ‘जनता कर्फ्यू’ बाबत प्रशासनाने आदेश पारित केले आहेत. आमची मुस्लिम समाजाच्या वतीने विनंती आहे. की, याच दरम्यान मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा व पवित्र सण ‘रमजान ईद‘ दिनांक १४ मे रोजी आहे. या सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना काही खरेदी करावयाची असते. त्याकरिता आपण ‘जनता कर्फ्यू’चा कालावधी दोन दिवसांसाठी कमी करून, मुस्लिम समाजाच्या सणासाठी काही काळापुरते शासकीय नियमाप्रमाणे निश्चित वेळेत किराणा दुकाने वक्री चालू ठेवावीत. शासनाच्या नियमांचे आम्ही कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणार नाही. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. Muslims demand reduction of ‘Janata Curfew’ to two days for Holy Ramadan Eid.

अशा पद्धतीने मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अख्तर भाई शेख, विद्यमान नगरसेवक निसार भाई बेपारी, अजीम भाई जकाते, वसीम भाई ताडे, अजिज भाई शेख, ad. राजू भाई पठाण यांनी निवेदन सादर केले आहे. तहसीलदार प्रदीप पवार यांच्या वतीने भाऊसाहेब ओगले यांनी सदरील निवेदन स्वीकारले आहे.

स्त्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading