अफवांवर विश्वास ठेवू नका; शेतकऱ्यांची देणी पुढच्या आठवड्यात पूर्ण करणार: ओमराजे बोत्रे पाटील..

ओंकार साखर कारखाना उद्योग समूहाची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल; अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार..

दिनांक ६ मे २०२६ पुणे/प्रतिनिधी:

राज्यात आणि देशात साखर उद्योगात आघाडीवर असलेल्या ओंकार साखर कारखाना उद्योग समूहाची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही समाजविघातक घटकांकडून जाणीवपूर्वक खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांवर शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांनी विश्वास ठेवू नये. येत्या आठवडाभरात सर्वांची देणी पूर्ण केली जातील, असे आवाहन समूहाचे श्री. ओमराजे बोत्रे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

बाबुराव बोत्रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार समूह आजमितीस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमध्ये तब्बल १७ कारखाने यशस्वीरीत्या चालवत आहे.

यावर्षी समूहाने ७५ लाख टन गाळप पूर्ण केले असून, आगामी काळात १ कोटी टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. समूहाशी ८ लाख शेतकरी, १८ हजार कर्मचारी आणि २.९५ लाख ऊसतोड मजूर जोडलेले आहेत.

काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘२ ते ३ हजार कोटी रुपये थकवले’ अशी खोटी माहिती पसरवली जात आहे.

त्यावर स्पष्टीकरण देताना ओमराजे बोत्रे पाटील म्हणाले की, राज्यातील १४० कारखान्यांकडे मिळून २१०० कोटींची FRP प्रलंबित आहे.,मात्र, ओंकार समूहाने आतापर्यंत १८३० कोटी रुपये शेतकऱ्यांना आणि ७१० कोटी रुपये वाहतूकदारांना अदा केले आहेत., केंद्र सरकारच्या ३३% इथेनॉल मिश्रणाच्या नवीन धोरणामुळे इथेनॉल व मळीची विक्री थांबवली आहे. त्याचे ७०० कोटी रुपये येणे बाकी असल्याने पेमेंटला केवळ महिनाभर उशीर झाला आहे.

समूहाची बदनामी केल्याप्रकरणी रविराज साबळे पाटील याच्यासह इतर समाजकंटकांवर राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लवकरच त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बोत्रे पाटील यांनी दिली.

“पुढील आठवड्यात शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांचा एकही रुपया शिल्लक राहणार नाही. आमची घोडदौड सुरूच असून, पुढील हंगामात २२ कारखान्यांच्या माध्यमातून १ लाख कोटी टन गाळपाचे आमचे ध्येय आहे.”
ओमराजे बोत्रे पाटील

स्रोत:(प्रेसनोट)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading