अहिल्यानगर जिल्ह्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ‘प्राणी दक्षता पथक’ नेमा; शिवछत्रपती गोरक्षा समितीची मागणी..

दिनांक १२ मे २०२६,अहिल्यानगर:

बकरी ईदच्या काळात होणारी गोवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तल रोखण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात प्रत्येक तालुका स्तरावर स्वतंत्र ‘प्राणी दक्षता पथक’ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी ‘आद्यगोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा समिती’च्या वतीने करण्यात आली आहे. समितीचे जिल्हाप्रमुख प्रतिक गोकुळ पाचपुते यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात ही मागणी केली असून, याकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे.

महाराष्ट्र शासनाने २०१५ पासून सुधारित ‘महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम’ लागू केला असला, तरी छुप्या पद्धतीने कत्तल सुरू असल्याच्या तक्रारी समितीने केल्या आहेत. या संदर्भात पोलीस प्रशासनावर असलेला कामाचा ताण विचारात घेऊन, केवळ प्राणी कल्याणासाठी स्वतंत्र पथक नेमले जावे, जे २४ तास अवैध कत्तलींवर नजर ठेवेल.

ज्या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कत्तल होते, अशा संवेदनशील भागांत (Hotspots) तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

कारवाई दरम्यान होणारा विरोध आणि गोंधळ टाळण्यासाठी तसेच पुराव्यांसाठी कारवाई करणाऱ्या पोलिसांना ‘बॉडी कॅमेरे’ देण्यात यावेत.

केवळ ‘सांभाळण्यासाठी’ जनावरे आणली आहेत असे खोटे कारण सांगून कारवाई टाळली जाते. अशा वेळी जनावरांचे पशुवैद्यकीय टॅगिंग करून ती स्थानिक गोशाळेत सुपूर्द करावीत.

महाराष्ट्रातून कर्नाटककडे होणारी गोवंशाची तस्करी रोखण्यासाठी सीमाभागात विशेष नाकाबंदी आणि तपासणी चौक्या उभाराव्यात. अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, अनेकदा पोलीस कारवाई करताना तांत्रिक चुका होतात. त्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाने १६ जून २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या सुधारित कार्यप्रणाली (SOP) नुसारच गुन्हे नोंदवण्यात यावेत. यामुळे कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक होईल.

“बकरी ईदच्या काळात गोवंशाची मोठ्या प्रमाणावर कत्तल होण्याची शक्यता असते. प्रशासनाने आमचा सात मुद्द्यांचा प्रस्ताव गांभीर्याने घ्यावा आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.”
– प्रतिक गोकुळ पाचपुते (जिल्हाप्रमुख, आद्यगोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा समिती)

आगामी सण-उत्सवाच्या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गोवंश हत्या बंदी कायद्याच्या पालनासाठी प्रशासन या निवेदनावर काय पाऊल उचलते, याकडे आता लक्ष लागले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading