श्रीगोंदा, दि. १ सप्टेंबर २०२५:
श्री शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले असून त्याविरोधात संताप व्यक्त करत श्रीगोंद्यातील संतोष इथापे व शांताराम पोटे सह नागरिकांनी बेमुदत धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.

स्मारकासाठी प्रशासकीय मान्यता, निधी आणि कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतरही नगरपालिकेकडून प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, याविरोधात आजपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले. दिलेल्या निवेदनात स्मारकाचे काम तातडीने सुरू करून पूर्णत्वास नेण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम सुरू केल्यानंतर ते बंद करून थांबवणे ही दुर्दैवी घटना असून जबाबदार व्यक्तींवर टीका करण्यात आली आहे. कुठे व इथापे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, काम तातडीने सुरू न झाल्यास धरणे आंदोलन बेमुदत सुरू राहील.

निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, तहसिलदार आणि पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली असून श्रीगोंदा नगरपरिषदेकडून याची पोहोच नोंद घेण्यात आली आहे.

स्थानिक शिवप्रेमी नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या चळवळीला पाठिंबा दिला आहे.
स्रोत:(निवेदन)
