आढळगाव जिल्हा परिषद शाळेसाठी २४ लाखांचा निधी मंजूर; दोन नवीन खोल्यांच्या बांधकामाला मिळणार गती..

दिनांक ८ एप्रिल २०२६,आढळगाव:

येथील ग्रामस्थांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, आढळगाव मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी जिल्हा नियोजन समिती (DPTC) मधून दोन नवीन खोल्यांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सुमारे २४ लाख रुपये खर्चाच्या या कामामुळे गावच्या ‘ज्ञान मंदिराचा’ कायापालट होणार असून विद्यार्थ्यांच्या सुविधेमध्ये मोलाची भर पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २० जून २०२५ पासून या खोल्यांच्या मंजुरीसाठी प्रशासकीय स्तरावर प्रामाणिक प्रयत्न सुरू होते. अखेर ७ एप्रिल २०२६ रोजी या प्रयत्नांना यश मिळाले.

शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी या कामाच्या प्रशासकीय मान्यतेचे अधिकृत पत्र माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांच्याकडे सुपूर्द केले.

सुमारे २४ लाख रुपये निधीतून या दोन नवीन आणि सुसज्ज खोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. शाळेची वाढती पटसंख्या आणि विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन हा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

या कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती श्रीकांत अनिल ठवाळ यांनी दिली आहे.
या निर्णयामुळे आढळगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून, शैक्षणिक सुविधेसाठी केलेल्या या पाठपुराव्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading