अहिल्यानगर जिल्ह्यात जबरी चोरी करणारे सराईत आरोपीची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद, आरोपींकडुन 10 गुन्हे उघडकीस आणुन, 11,19,800/- रुपये किमतीचा मुद्देमालासह जप्त…

दिनांक १२ मे २०२६, अहिल्यानगर:

अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 317/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6) प्रमाणे दिनांक 21/04/2026 रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी सौ ताराबाई मुरलीधर कोकाटे हे शेतामध्ये काम करत असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे गळ्यातील 78,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरुन नेलेले आहेत.

सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली सपोनि/ हरिष भोये, महादेव गुट्टे पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब खेडकर, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ, मनोज साखरे, सुनिल मालणकर, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, किरण ठुबे, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.

वरील पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणची पाहणी केली. सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना व्यवसायीक कौशल्याचे आधारे सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे गणेश दिवानजी काळे रा. वाकोडी ता.जि. अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासह केला असुन तो त्याचे साथीदारासह अहिल्यानगर सोलापुर जाणारे रोडवर वाकोडी गावचे शिवारात जुना जकात नाका येथे दोन मोटार सायकलवर आले असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पथकाने मिळालेल्या माहितीचे आधारे सदर ठिकाणी जावुन खात्री करता जुना जकात नाका येथे दोन मोटार सायकल जवळ तीन इसम उभे असल्याचे दिसुन आले. पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असतांना ते तेथुन पळुन जावु लागले त्यावेळी पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे 1) गणेश दिवानजी काळे वय – 28 वर्षे रा. वाकोडी ता. जि. अहिल्यानगर, 2) विनय उर्फ टकल्या योगेश काळे वय – 19 वर्षे रा. वाळुंज ता.जि. अहिल्यानगर, 3) रोहित लल्या भोसले वय – 23 वर्षे रा. सराटी वडगांव ता. आष्टी जि. बीड असे असल्याचे सांगितले.

ताब्यातील इसम नामे गणेश दिवानजी काळे याचेकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने त्याचे आणखी दोन साथीदासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

पथकाने गुन्ह्यामध्ये चोरी केलेले दागिने आरोपीचे कब्जातुन व आरोपीचे राहते घरातुन 9,04,800/- रु कि. चे 64 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, 40 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, 45,000/-रु कि.चे तीन मोबाईल, 1,70,000/- रु कि.चे दोन मोटार सायकल  असा एकुण 11,19,800/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

आरोपीकडे त्यांनी आणखी अशा प्रकारे गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल तपास करता आरोपीकडुन  अहिल्यानगर जिल्ह्यातील खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत.

1 अहिल्यानगर तालुका, जि. अहिल्यानगर 317/2026 बी.एन.एस.कलम 309(6)
2 अहिल्यानगर तालुका, जि. अहिल्यानगर 276/2026 बी.एन.एस.कलम 309(6),3(5)
3 श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर 410/2026 बी.एन.एस.कलम 309(4)
4 श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर 399/2026 बी.एन.एस.कलम 304(2),3(5)
5 श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर 28/2026 बी.एन.एस.कलम 309(4),305(अ)
6 श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर 317/2026 बी.एन.एस. कलम 331(4), 305(अ)
7 सुपा, जि. अहिल्यानगर 85/2026 बी.एन.एस. कलम 309(4)
8 बेलवंडी, जि. अहिल्यानगर 143/2026 बी.एन.एस. कलम 309(6)
9 अहिल्यानगर तालुका, जि. अहिल्यानगर 302/2026 बी.एन.एस. कलम 309(6)
10 तोफखाना, जि. अहिल्यानगर 342/2026 बी.एन.एस. कलम 304

ताब्यातील आरोपी नामे 1) गणेश दिवानजी काळे वय-28 वर्षे रा.वाकोडी ता.जि. अहिल्यानगर, 2) विनय उर्फ टकल्या योगेश काळे वय-19 वर्षे रा. वाळुंज ता.जि. अहिल्यानगर, 3) रोहित लल्या भोसले वय-23 वर्षे रा. सराटी वडगांव ता.आष्टी जि. बीड यांना गुन्ह्याचे तपासकामी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करुन अटक करण्यात आले असुन पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे करीत आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading