पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक १५ मे रोजी..

दिनांक ११ मे २०२६,अहिल्यानगर

जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक शुक्रवार, दि. १५ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे.

जिल्ह्यातील विविध विकासकामे, निधी वाटप, प्रलंबित योजना तसेच विभागनिहाय आढावा या बैठकीत घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी दिली आहे.
बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

स्रोत:(Dio)

Leave a Reply