दिनांक २२ एप्रिल २०२६, अहिल्यानगर:
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील उद्योजिका सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून भरडधान्यांवर आधारित उद्योग उभारून स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत पोहोचवले आहे.
‘समृद्धी ॲग्रो’ व ‘Good To Eat’ या ब्रँडद्वारे ज्वारी, बाजरी, नाचणीसारख्या पारंपरिक धान्यांना आधुनिक उत्पादनांमध्ये रूपांतरित करत त्यांनी देशासह सात देशांत आपली ओळख निर्माण केली आहे. राज्य शासनाकडून उत्कृष्ट महिला उद्योजिका व उत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे.
या उद्योगातून शेकडो शेतकरी व स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक दर देत आत्मनिर्भरतेचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. पोषकतत्त्वे जपणारी आरोग्यदायी उत्पादने तयार करून त्यांनी ‘Healthy India’ च्या दिशेनेही महत्त्वाचे योगदान दिले आहे.
👉 स्थानिक ते जागतिक असा प्रवास
👉 महिलांचे सक्षमीकरण व रोजगारनिर्मिती
👉 शेतकऱ्यांना योग्य दर व टिकाऊ विकास
ही यशोगाथा ग्रामीण उद्योजकतेसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
