दिनांक ७ डिसेंबर २०२५,श्रीगोंदा (अहिल्यानगर):
मराठा लाईट इन्फंट्री (Maratha LI) युनिट 5 मध्ये कार्यरत असलेले आणि सध्या अयोध्येत (Ayodhya) सेवेत असलेले श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी गावचे भूमिपुत्र हवालदार गोकुळ नागेश वाळके (वय ३५) यांचे दिनांक ०५/१२/२०२५, शुक्रवार रोजी कर्तव्यावर असताना दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे चांभुर्डी गावावर आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार वाळके यांना डोक्यला मार लागल्यामुळे वीरमरण आले. त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी देशसेवेत असताना आपले जीवन अर्पण केले.

शहीद हवालदार गोकुळ वाळके यांच्या पार्थिवावर सोमवार, दिनांक ०८/१२/२०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता त्यांचे मूळ गाव चांभुर्डी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सैनिक सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती सोनाली वाळके (सासरवाडी- अरणगाव दुमाला, मोरे), दोन लहान मुली – आरोशी (११ वर्ष) आणि त्रि शा (४ वर्ष), असा परिवार आहे. त्यांचे बलिदान देशासाठी मोठे असून, वाळके कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
सर्व ग्रामस्थ, मित्र परिवार, आप्तेष्ट, पाहुणे आणि माजी सैनिकांना विनंती आहे की, त्यांनी या वीरपुत्राला अंतिम मानवंदना देण्यासाठी ०८/१२/२०२५ रोजी सकाळी अंदाजे १० वाजता चांभुर्डी येथे उपस्थित रहावे.
स्रोत:(निवास नाईक)
