दुःखद बातमी: पंचायत समिती श्रीगोंदा येथील सेवानिवृत्त आदर्श कर्मचारी श्री आबूभाई शेख यांचे निधन..

दिनांक ७ डिसेंबर २०२५,श्रीगोंदा:

पंचायत समिती श्रीगोंदा येथे ३५ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणारे आणि आदर्श कर्मचारी सेवा पुरस्काराने सन्मानित झालेले श्री आबूभाई दाऊदभाई शेख (शेख मिस्त्री) यांचे शनिवार, दिनांक ०६ डिसेंबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने श्रीगोंदा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

श्री आबूभाई शेख यांनी पंचायत समिती श्रीगोंदा येथे सुमारे ३५ वर्षे अविरत सेवा केली आणि तेथूनच ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा, निष्ठा आणि सचोटी यासाठी त्यांची ओळख होती. त्यांच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन त्यांना सन १९९४-९५ मध्ये ‘आदर्श कर्मचारी सेवा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.

https://amzn.to/4pSbGnR

त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ते अर्शद कॉम्प्युटर इन्स्टिटयूटचे संचालक श्री अमीन शेख सर यांचे तसेच Blooming Buds Pre School च्या संचालिका सौ. जबीन सलीम सय्यद यांचे वडील होते.

श्री आबूभाई शेख यांच्या निधनामुळे श्रीगोंदा येथील एक निष्ठावान आणि आदर्श व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply