दिनांक २८ जानेवारी २०२६,बारामती:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांचे चार्टर्ड विमान लँडिंगच्या वेळी कोसळले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या सर्व ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज सकाळी ८:४५ वाजता बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ हा अपघात झाला. खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाडामुळे ‘Learjet 45’ हे विमान लँडिंग करताना शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली.
या अपघातात अजित पवार, त्यांचे अंगरक्षक, एक सहाय्यक आणि दोन वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून आज शासकीय सुट्टी घोषित केली आहे. पंतप्रधान मोदींनीही या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे.
“अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आज सायंकाळी ४:०० वाजता श्रीगोंदा शहरात संत शेख महंमद महाराज मंदिरात शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष इथापे ..
स्रोत:(ऑनलाइन वृत्त)
