लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी ‘डिकोय’ कारवायांवर भर द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश..

दिनांक २७ जानेवारी २०२६,अहिल्यानगर:

जिल्ह्यातील मुलांच्या तुलनेत मुलींचे लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी केवळ नियमित तपासणीवर अवलंबून न राहता, संशयास्पद केंद्रांवर ‘सापळा तपासणी’ (Decoy Operation) आणि गुप्त माहितीच्या आधारे कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याच्या अंमलबजावणीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रशासनाला मार्गदर्शक सूचना केल्या:

ज्या तालुक्यांमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे, तिथे विशेष लक्ष केंद्रित करून दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करावेत.

जन्म-मृत्यू नोंदणीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून शंभर टक्के नोंदणीचे उद्दिष्ट गाठावे.

https://amzn.to/4bmYALk

‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी दरमहा २५० हून अधिक नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे.

संशयित क्षयरुग्णांची तपासणी वाढवून प्रत्येक रुग्णाची नोंद ‘निक्षय’ पोर्टलवर तात्काळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading