दिनांक १ फेब्रुवारी २०२६,श्रीगोंदा, अहिल्यानगर:
जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे प्रमुख आणि नायब तहसीलदार किरण रामदास देवतरसे (५८) यांचा मृतदेह आज सकाळी निंबळक परिसरातील रेल्वे रुळावर आढळून आला. या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

देवतरसे यांनी श्रीगोंदा, शेवगाव आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम केले होते. येत्या सहा महिन्यांत ते सेवानिवृत्त होणार होते.
गेल्या दोन वर्षांपासून ते मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची जबाबदारी सांभाळत होते. मागील तीन दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा महसूल वर्तुळात सुरू आहे.

हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. एमआयडीसी पोलिसांनी सध्या आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
देवतरसे यांच्या पश्चात त्यांच्या निधनाने जिल्हा प्रशासनाने एक मनमिळाऊ आणि अनुभवी अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
