दिनांक ६ जानेवारी २०२६,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील पांढरकर मळा परिसरात आज मंगळवारी (दि. ६ जानेवारी) एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
वस्तीजवळच असलेल्या लक्ष्मी आई मंदिराच्या खालील बाजूस असलेल्या बंधाऱ्यातील पाण्यात हा मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसला.

पांढरकर मळा परिसरात नागरिक सकाळी वावरत असताना त्यांना बंधाऱ्याच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसून आला.
याची माहिती त्वरित स्थानिक प्रशासनाला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी पाचारण झाले.

भरवस्तीत ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
