श्रीगोंदा पोलिसांकडून गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंट; न्यायालयात मोबाईल वापराची दिली मुभा..?

दिनांक ५ जानेवारी २०२६ श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयात हजर करताना त्यांना चक्क ‘व्हीआयपी’ वागणूक दिली जात असल्याचा आरोप काष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुभाष कोंडीबा चौधरी यांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिसपे आणि सलग्न गंभीर गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता, पोलिसांनी त्यांना बेड्या न घालता मुक्तपणे वावरू दिले. इतकेच नव्हे तर, पोलीस कोठडीत किंवा बंदोबस्तात असताना आरोपींना मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही, या आरोपींना पोलिसांचाच मोबाईल वापरण्याची मुभा देण्यात आल्याचा खळबळजनक दावा श्री. चौधरी यांनी केला आहे.

एकीकडे सर्वसामान्य जनतेसाठी कायदा कठोर असतो, तर दुसरीकडे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना पोलीस संरक्षणात असताना अशा प्रकारे मोकळीक मिळणे, हे कायदा व सुव्यवस्थेसाठी घातक असल्याचे बोलले जात आहे.

https://amzn.to/49FNijV

आरोपींना गुन्हेगारांसारखी वागणूक देण्याऐवजी त्यांना विशेष पाहुणचार (Special VIP Treatment) दिला जात असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकाराबाबत सुभाष चौधरी यांनी तीव्र निषेध नोंदवला असून, “गुन्हेगारांना अशा प्रकारे मोकळीक देणे कितपत योग्य आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित हलगर्जीपना करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अन्यथा कारवाई साठी लवकरच उपोषण करण्यात येईल असा इशारा चौधरी यांनी दिला आहे..

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply