बोगस ‘आयएएस’ प्रकरणात श्रीगोंद्यातून चौथा आरोपी जेरबंद..

दिनांक ७ डिसेंबर २०२५, श्रीगोंदा/छत्रपती संभाजीनगर..:

छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलिसांनी बोगस आयएएस कल्पना भागवत प्रकरणात चौथा आरोपी दत्तात्रय पांडुरंग शेटे (३८, रा. मांडवगन) याला शनिवारी (दि. ६) श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून अटक केली.

दत्तात्रय शेटे याला श्रीगोंद्यातून अटक करण्यात आली. त्यानेच कल्पनाला ‘आयएएस’ बनवतो असे सांगून विश्वास संपादन केला होता आणि तिची ओळख मनोज लोढा याच्याशी करून दिली होती. या दोघांनीच बनावट ‘आयएएस’ यादी तयार केल्याचे उघड झाले आहे.

न्यायालयाने कल्पना भागवतला न्यायालयीन कोठडी सुनावली, तर दत्तात्रय शेटे याला ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.

https://www.amazon.in/dp/B0D772K8X8/ref=cm_sw_r_as_gl_apa_gl_i_EC04MPBC92FFH06T0743?linkCode=ml1&tag=nirbhidkalam-21&linkId=f9a9f3caab3afe5a6b3ba235cb5b33e9

यापूर्वी कल्पना भागवत, तिचा प्रियकर अशरफ खिल (अफगाणी नागरिक) आणि कथित बनावट ओएसडी डिम्पी हरजाई यांना अटक करण्यात आली आहे.

आयबी (IB) आणि एटीएसने (ATS) केलेल्या चौकशीत कल्पनाचा कोणताही देशविघातक दुवा आढळला नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

बचाव पक्षाचे वकील ॲड. अभयसिंह भोसले यांनी पोलिसांना ठोस पुरावे न मिळाल्याचा आणि तपास गोंधळलेला असल्याचा आरोप केला आहे. सर्व आर्थिक व्यवहार बँक खात्यातून झाले असून, देशविघातक कारवायांचा संबंध सिद्ध झालेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading