काष्टी येथील वारकरी कै. लक्ष्मीबाई रंधवे यांचे निधन.

दिनांक ७ ऑक्टोबर २०२५,(काष्टी, श्रीगोंदा):

वारकरी संप्रदायाशी अनेक वर्षे जोडलेल्या कै. लक्ष्मीबाई माणिकराव रंधवे यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी काष्टी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या दरवर्षी काष्टी ते पंढरपूर पायी दिंडीत नियमितपणे सहभागी होत असत.

मनमिळाऊ स्वभाव, भक्तिमय वृत्ती आणि सामाजिक सहभाग यामुळे त्या परिसरात सर्वांच्या आदरास पात्र होत्या. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायासह काष्टी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काष्टी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी वारकरी, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्या नाभिक महामंडळाचे युवा जिल्हाध्यक्ष पै. अजय रंधवे, शिवराय केसरी पै.प्रा. रोहन रंधवे यांच्या चुलती, तर आप्पासाहेब रंधवे यांच्या मातोश्री होत्या.

स्रोत:(पै.अजय रंधवे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading