श्रीगोंद्यात ‘राजलक्ष्मी सोलर एजन्सी’चे थाटात उद्घाटन; PM मोदींच्या सोलर व्हिजनला बळ देणार: ठवाळ, भालेराव..

राजलक्ष्मी सोलर एजन्सी या नव्या दालनाचा श्रीगोंदा मध्ये भव्य उद्घाटन समारंभ सपन्न..

दिनांक ७ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:

भारत सरकारच्या सौर ऊर्जा धोरणांतर्गत, गाव-खेड्यांपर्यंत वीज पोहोचवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, ‘राजलक्ष्मी सोलर एजन्सी’ या नव्या दालनाचा भव्य उद्घाटन समारंभ श्रीगोंदा शहरात नुकताच थाटात पार पडला.

यावेळी बोलताना एजन्सीचे प्रोप्रायटर श्रीकांत ठवाळ आणि शाम भालेराव यांनी स्पष्ट केले की, देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली असली तरी आजही ग्रामीण भागात लाईटची दुरावस्था कायम आहे.

ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सोलर उपकरणांवर भरघोस सबसिडी देऊन सामान्य नागरिकांच्या घरांपर्यंत एकविसाव्या शतकाचा उजेड पोहोचवण्याचे विश्वसनीय पाऊल उचलले आहे.

घरातील तसेच कमर्शियल व इंडस्ट्रियल क्षेत्रातही सूर्याच्या प्रखर तेजापासून तयार होणाऱ्या लाईटचा उपयोग व्हावा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा उद्योग सुरू केला असून, यासाठी पंतप्रधानांनी दिलेल्या अनुदानामुळे गोरगरीब जनतेची मोठी सेवा होत आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

या कार्यक्रमाला तालुक्याचे माजी आमदार बबनदादा पाचपुते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, माजी जि.प. सदस्य अनिल ठवाळ, माजी प.स. सदस्य राजेंद्रजी म्हस्के, माजी प.स. सदस्य हरिदास आबा शिर्के, पैलवण आप्पसाहेब सोनवणे, सरपंच शिवप्रसाद उबाळे, उपसरपंच अनुराधाताई ठवाळ आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना बबनराव पाचपुते यांनी तालुक्यामध्ये केलेल्या तीस वर्षांच्या विकास कामांचा सविस्तर लेखाजोखा सादर केला.

२१ कोटी रुपयांची रोडची कामे, गटर लाईनची कामे आणि डांबरीकरणाची कामे ही तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाची ठरली. भविष्यातही तालुक्याला योग्य वाटेवर घेऊन जाऊन विकासाचे काम अविरत सुरू ठेवणार असल्याचे वचन त्यांनी दिले. तसेच, त्यांनी ‘राजलक्ष्मी सोलर एजन्सी’च्या नव्या दालनाला शुभेच्छा दिल्या.

बाबासाहेब भोस यांनीही यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, पाचपुते आणि आम्ही दोघांनी मिळून नगरपालिकेच्या माध्यमातून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले. त्यामुळे आज श्रीगोंदा तालुका अतिशय सुंदर असून, येथील सोयी-सुविधांमुळे दूरवरून येणाऱ्या लोकांचा श्रीगोंदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुणे शहरासारखा झाला आहे.

यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री अनिल ठवाळ यांनी बबनराव पाचपुते यांनी केलेल्या कामांची प्रशंसा केली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, “दादा आम्हाला प्रेमाने जवळ घ्या आणि कुठेतरी सत्तेमध्ये सहभागी होऊन तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करण्याची संधी द्या,” अशी भावनिक विनंती केली.

कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रास्ताविक राजलक्ष्मी सोलर एजन्सीचे सर्वेसर्वा श्रीकांत ठवाळ आणि शाम भालेराव यांनी अतिशय सुंदर केले, असे गौरवोद्गार माजी आमदार श्री. बबनराव दादा पाचपुते यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून व्यक्त केले.

जय बजरंग तालमीचे संस्थापक वस्ताद दीपक नाना भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार तसेच उद्योजक संदीप शेठ गुगळे, चेअरमन दादासाहेब गव्हाणे, व्हाईस चेअरमन दत्ताभाऊ चव्हाण, पोलीस पाटील पोपटराव छत्तीसे, पत्रकार जावेद भाई इनामदार यांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading