श्रीगोंदा पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर..

दिनांक ७ ऑक्टोबर २०२५,अहिल्यानगर:

श्रीगोंदा तालुका पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अखेर सर्वसाधारण महिला आरक्षण घोषित झाले आहे. आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे ही आरक्षण सोडत काढण्यात आली. पंकज आशिया यांनी जाहीर केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सोडतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. आगामी काळात श्रीगोंदा पंचायत समितीचे नेतृत्व एका सर्वसाधारण प्रवर्गातील महिला सदस्याकडे राहणार हे आता निश्चित झाले आहे.

या आरक्षणामुळे श्रीगोंदा पंचायत समितीमधील राजकीय समीकरणे बदलणार असून, सभापती पदासाठी इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading