दिनांक २८ ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा:
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे संघटन करणाऱ्या विजया लंके यांनी पुणेरी वडापावच्या माध्यमातून खाद्य व्यवसायात नवा अध्याय सुरू केला आहे. श्रीगोंद्याच्या ग्राहकांकडून त्यांना याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जनरल स्टोअर्सच्या अनुभवातून प्रेरित होऊन त्यांनी खाद्य व्यवसायात पाऊल ठेवले आहे.
वडापाव व्यवसायाच्या या नव्या इनिंगचा शुभारंभ नुकताच श्रद्धा शिंदे, अनुराधा नागवडे, आणि विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते झाला. सिल्लोड येथील त्यांच्या मैत्रिणी श्रद्धा शिंदे हिच्या सहकार्याने श्रीगोंदा शहरात दिल्ली वेस जवळ या व्यवसायाची सुरुवात केली. कमीत कमी जागेत स्टॉल उभारला असून, “स्वच्छता आणि उत्कृष्ट दर्जा” ही टॅगलाईन घेऊन त्यांनी वडापाव व्यवसायात एन्ट्री केली आहे.
या वडापावची चव स्वादिष्ट आणि झणझणीत आहे. विशेष म्हणजे, तेलकटपणा नियंत्रित करण्यात आला असल्याने हा वडापाव चोखंदळ खवय्यांचा विश्वास पटकावत आहे. श्रीगोंद्याच्या रहिवाशांनी या अनोख्या चवीला उचलून धरले असून व्यवसायाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
शुभारंभाच्या वेळी बाळासाहेब महाडीक, विठ्ठलराव दरेकर, नवनाथ दरेकर, राजकुमार इथापे, राजेश इंगळे, भाऊसाहेब खेतमाळीस, अमोल गव्हाणे, अकुंश ढवळे, अॅड. संपतराव इधाटे, गोपाळराव डांगे, प्रशांत एरंडे, दत्ता हिरवे, प्रतिभा गांधी, अंजली बगाडे, मनीषा काकडे, प्रियांका वाघमारे, पुनम फिरोदिया, गौरी कोहळे आणि संगीता भोंग यांनी विजया लंके यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिठू लंके यांनी मानले.
महिला बचत गटांद्वारे महिलांचे संघटन करीत व्यवसायात उतरलेल्या विजया लंके यांच्या या उपक्रमाला स्थानिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या मैत्रिणीच्या सहकार्याने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला असून, भविष्यात तो अधिक विस्तारण्याचा त्यांचा मानस आहे.
“माझे वडील, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक अंकुश ढवळे यांच्या प्रेरणेतून माझ्या जन्मभूमीत मैत्रिणीसोबत हा व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे तिला हक्काचा रोजगार मिळेल आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, अशी माझी अपेक्षा आहे. विजया लंके यांचा काम करण्याचा उत्साह मोठा आहे, त्यामुळे त्या नक्कीच यशस्वी होतील.”
विजया लंके यांच्या अथक मेहनतीने आणि उत्तम दर्जाच्या वडापावमुळे पुणेरी वडापाव व्यवसायात त्यांची नवी इनिंग नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचेल, असा विश्वास श्रीगोंद्याच्या जनतेने व्यक्त केला आहे.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)




