संगमनेरमधील अशोभनीय वक्तव्याचा श्रीगोंदा काँग्रेसकडून तीव्र निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी..

दिनांक २८ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा/संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे विखे परिवाराचे निकटचे स्नेही वसंत देशमुख यांनी संगमनेर विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या बद्दल अत्यंत अशोभनीय आणि निंदनीय वक्तव्य केले आहे. या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वसंत देशमुख याच्यावर कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर भाजपाचे नेते सुजय विखे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी काँग्रेसची मागणी आहे.

श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना दिलेल्या निवेदनात, काँग्रेसच्या महिला नेत्यांविषयी केलेल्या अशोभनीय वक्तव्याबद्दल संपूर्ण महिला भगिनींचा अपमान झाल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. तसेच, चिचोंडी पाटील येथे अंगणवाडी सेविकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेत दोषींना तात्काळ अटक करून, फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, शहराध्यक्ष मनोहर पोटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सुनीताताई दरोडे, भूषण शेळके, धीरज खेतमाळी, कांतीलाल कोकाटे, शशिकांत पवार, शिवाप्पा घोडके, ज्ञानेश्वर खेतमाळीस, नंदू ससाणे हे पदाधिकारी उपस्थित होते. याबाबतचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक निकम यांना देण्यात आले आहे.

काँग्रेसच्या वतीने, जर दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

स्रोत:(आंदोलन/निवेदन)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading