दिनांक, २८ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा मतदार संघातील २२६ विधानसभा निवडणुकीसाठी आज १० उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.











या निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये अनुराधा राजेंद्र नागवडे, पांडुरंग नारायण खेतमाळीस, राजेंद्र शिवाजीराव नागवडे, अण्णासाहेब सिताराम शेलार, प्रतिभा बबनराव पाचपुते, विक्रम बबनराव पाचपुते, गोरख दशरथ आळेकर, राहुल संजय छत्तीसे, महेंद्र दादासाहेब शिंदे, घनश्याम प्रतापराव शेलार, आणि बाप्पू शिवाजी क्षीरसागर यांचा समावेश आहे.
आज झालेल्या नामांकन प्रक्रियेत सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार क्षितिजा वाघमारे आणि स्थानिक प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतरीत्या पार पाडली. या प्रक्रियेत प्रशासनाच्या पूर्ण तयारीमुळे शांतता आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यात आले. उमेदवारांच्या अर्जांसह त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
स्रोत:(अधीकृत माहिती)




