श्रीगोंदा | २१ डिसेंबर २०२५:
गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा निकाल अखेर आज जाहीर झाला.
या निवडणुकीत श्रीगोंदेकर मतदारांनी प्रस्थापितांना जोरदार धक्का देत ‘विकासाच्या मुद्द्याला’ कौल दिला आहे. अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या जुन्या चेहऱ्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला असून, भाजपा आणि शिवसेनेच्या विजयाने शहरात नवीन राजकीय समीकरणाची नांदी झाली आहे. सोबत महिलां पदाधिकाऱ्यांची लक्षणीय यादी विजयात समाविष्ट झाली.

निवडणुकीपूर्वी माध्यमांनी वर्तवलेले अंदाज आणि लावलेले निकष निकालातून तंतोतंत खरे ठरले आहेत. शहराच्या विकासाचा रखडलेला मुद्दा आणि ‘जुने चेहरे बदला’ ही सर्वसामान्यांची भावना मतपेटीतून स्पष्टपणे उमटली आहे.
विशेष म्हणजे, वर्षानुवर्षे पालिकेवर वर्चस्व गाजवणाऱ्या काही दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १३ जागांवर यश मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर शिवसेनेने ९ जागांवर विजय मिळवून नगरपालिकेत निर्णायक भूमिका बजावली आहे..
नगराध्यक्षपदी भाजपाच्या सुनिता संतोष खेतमाळीस यांनी बाजी मारली असून, आता भाजपा… शिवसेनाचे नगरसेवक शहराच्या विकासाचा गाडा हाकणार आहेत.

नवनिर्वाचित विजयी उमेदवारांची यादी:
नगराध्यक्ष सुनिता संतोष खेतमाळीस (भाजपा)
प्रभाग १ पल्लवी पांडुरंग पोटे (शिवसेना), राजेंद्र खेडकर (भाजपा)
प्रभाग २ सुशिलकुमार शिंदे (शिवसेना), चांदणी दिलीप खेतमाळीस (भाजपा)
प्रभाग ३ एम. डी. शिंदे (भाजपा), अनिता दादा औटी (शिवसेना)
प्रभाग ४ अनिल औटी (शिवसेना), वंदना संग्राम घोडके (भाजपा)
प्रभाग ५ अख्तर शेख (शिवसेना), दिपाली बोरुडे (शिवसेना)
प्रभाग ६ सोनाली सागर गोरे (भाजपा), सुनिता अनिल घोडके (भाजपा)
प्रभाग ७ अश्विनी प्रवीण काळे (भाजपा), अलका सुनिल अनभुले (भाजपा)
प्रभाग ८ ऋषिकेश (बंटी) बोरुडे (शिवसेना), कोमल विकास बोरुडे (भाजपा)
प्रभाग ९ मनिषा विठ्ठल आनंदकर (भाजपा), शहाजी तुकाराम खेतमाळीस (भाजपा)
प्रभाग १० प्रशांत गोरे (भाजपा), मिरा नितीन शिंदे (भाजपा)
प्रभाग ११ भामाबाई कोथिंबीरे (शिवसेना), श्रीकृष्ण (बाबूशेठ) धुमाळ (शिवसेना) …
“या निवडणुकीतून जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे की, केवळ राजकारण नको.. तर, शहराचा सर्वांगीण विकास हवा. निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी आत्ता श्रीगोंद्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे, अन्यथा श्रीगोंद्याची जनता सुज्ञ असून येणाऱ्या काळात पुन्हा बदल घडवण्यास मागे-पुढे पाहणार नाही, हे या निकालाने अधोरेखित केलेले आहे.”
स्रोत:(अधिकृत माहिती)
