#श्रीगोंदा: डमी उमेदवार सतीश बोरुडे यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला..

दिनांक ३० नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:

नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या वतीने डमी उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज सादर करणारे श्रीगोंदा येथील सतीश मारुती बोरुडे (प्रभाग ७ ब) यांच्या नामनिर्देशन पत्राला अवैध ठरवण्याचा निर्णय माननीय न्यायालयाने कायम ठेवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी सतीश मारुती बोरुडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी (Returning Officer) यांच्या निर्णयाविरुद्ध अपील सादर केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयात म्हटले होते की, सतीश मारुती बोरुडे यांनी सादर केलेल्या नामनिर्देशन अर्जात एकच सूचक (Proposer) असल्यामुळे त्यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले आहे.

नियमानुसार, नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या उमेदवाराव्यतिरिक्त इतर उमेदवारांच्या अर्जावर आवश्यक सूचकांची संख्या पूर्ण करणे बंधनकारक असते.

https://www.amazon.in/dp/B07KYN7124/ref=cm_sw_r_as_gl_apa_gl_i_MT6SAPQGYT9PDRYHC34V?linkCode=ml1&tag=nirbhidkalam-21&linkId=df509b1a7f7f6ad92626870d90d9c881

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या या निर्णयावर बोरुडे यांनी माननीय न्यायालयात दाद मागितली होती. तथापि, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी माननीय न्यायालयाने या अपीलावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

न्यायालयाने अपिलार्थी (सतीश मारुती बोरुडे) यांचे अपील फेटाळून लावले आणि मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविलेला निर्णय कायम ठेवला. या निर्णयामुळे सतीश मारुती बोरुडे यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावे लागले आहे.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading