दिनांक ३० नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत (Shrigonda Municipal Election) सध्या एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. जातक कथेतील पौराणिक ‘युद्धनीती’ (War Strategy) म्हणजेच साम, दाम, भेद, आणि दंड (Saam, Daam, Bhed, Dand) या चतुःसूत्रीचा वापर आता येथील राजनीती (Political Strategy) बनला आहे का, असा प्रश्न शहरवासीयांच्या मनात निर्माण झाला आहे.
या चर्चांना तोंड फोडणारे एक ताजे प्रकरण समोर आले आहे. एका बड्या राजकीय नेत्याने निवडणूक प्रचारादरम्यान अल्पसंख्यांक समुदायाच्या (Minority Community) बांधवांना ‘गोड बोलून एक प्रकारची धमकी’ दिल्याची चर्चा श्रीगोंदा शहरात चांगलीच गाजत आहे.

एका नेत्याने समुदायाच्या लोकांना असे सांगितल्याचे वृत्त आहे की, “जेव्हा तुमचे अतिक्रमण (Encroachment) काढण्यासाठी श्रीगोंदा नगरपालिकेचा बुलडोझर (Bulldozer) आला होता, तेव्हा आम्हीच तो बुलडोझर आणि अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया थांबवली होती. त्यामुळे तुम्ही विचलित न होता आमच्यावर लक्ष ठेवा.” हा ‘प्रेमळ सल्ला’ किंवा ‘दम’ अल्पसंख्यांक वस्तीत चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय हित साधण्यासाठी अशा पद्धतीने ‘प्रेमळ सल्ला’ देणे हे एक प्रकारे निवडणूक आचारसंहितेचा भंग (Violation of Code of Conduct) मानला जातो.
मात्र, मतदार राजा हा केवळ मतदान कालखंडातच ‘राजा’ राहतो, आणि निवडणूक संपताच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या छत्रछायेत सापडू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या अल्पसंख्यांक समुदायातील समाज बांधवांनी या प्रकरणाची नुसती आपापसात चर्चा करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय निवडला नाही.
सध्या श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक ही थेट साम, दाम, भेद आणि दंड या प्रक्रियेला ‘फॉलो’ (अनुसरण) करत आहे की काय, असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे.
साम: हात, पाय पडून, आदराने वाकून, सामंजस्याने बोलून आपले राजकीय कार्य साधणे.
दाम: बिर्याणी, मटण, दारू चारून, आर्थिक मोबदला देऊन किंवा आमिष दाखवून लोकांना आपल्या बाजूने वळवणे.
भेद: आणि आता, नमूद प्रकरणातून समोर आलेल्या ‘प्रेमाने’, ‘तिरप्या’ व ‘खोचक’ शब्दांचा वापर करून मतदारांमध्ये फूट पाडणे आणि आपले राजकारण साध्य करण्याची ही अनोखी संकल्पना श्रीगोंद्यातील राजकारण्यांनीही हस्तगत केल्याचे स्पष्ट होते.
शेवटी, ‘दंड’ ही प्रक्रिया आता निवडणुकीनंतर मतदारांना पाहायला मिळू नये, एवढीच अपेक्षा शहरवासी व्यक्त करत आहेत.!
स्रोत:(अधिकृत माहिती)
