दिनांक २० डिसेंबर २०२५ श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या प्रभाग ७ ‘ब’ मधील पोटनिवडणुकीत शनिवारी मोठं नाटकं पाहायला मिळाले. बोगस मतदानाच्या संशयावरून उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.
मात्र, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या गोंधळात पोलिसांनी एका तरुणीसह अन्य दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

प्रभाग ७ ‘ब’ मध्ये सकाळपासून शांततेत मतदान सुरू होते. सायंकाळपर्यंत ७६.७८% मतदान झाले. मात्र, मतदान केंद्रावर काही मतदारांनी फोटो काढल्याच्या तक्रारीवरून तणाव निर्माण झाला.
त्यानंतर, ४१ वर्षीय महिलेच्या जागी बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुण मुलीला निवडणूक अधिकाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
बोगस मतदानाच्या संशयावरून भाजप आणि शिवसेना उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.
मतदान केंद्र परिसरात गोंधळ घालणाऱ्या दुसऱ्या प्रभागातील एका उमेदवाराला आणि एका नगरसेविका पदाच्या उमेदवाराच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
