तळेगाव ढमढेरे घरफोडी प्रकरणाचा छडा; दोन आरोपींना अटक…श्रीगोंद्यातील एकास अटक..

दिनांक २० डिसेंबर २०२५, श्रीगोंदा/शिक्रापूर:

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे बंद घराचे कुलूप तोडून अडीच तोळे सोने आणि ५० हजार रुपयांची रोकड चोरणाऱ्या चोरट्यासह, चोरीचा माल घेणाऱ्या साथीदाराला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.

https://amzn.to/48TR8nW

दिनांक १४ ऑक्टोबर रोजी गुलाब बाबुराव नरके यांच्या बंद घरात ही चोरी झाली होती.

https://www.amazon.in/dp/B0DG3H4B43/ref=cm_sw_r_as_gl_apa_gl_i_dl_BW1B5XN0BHJ1DFH2JRQC?linkCode=ml1&tag=nirbhidkalam-21&linkId=c5b1eebc4cab7da796ca1797087c0f19

यात नवनाथ उर्फ मटक्या ईश्वर भोसले (वय २५, रा. बेलगाव, कर्जत) आणि चोरीचे दागिने विकत घेणारा धोंडीबा अर्जुन उगले (वय ३८, रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) होते.

https://amzn.to/4s8DpCA

पोलीस हवालदार अमोल चव्हाण यांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply