#Accident.. लोणंद-सातारा मार्गावर भीषण अपघात: श्रीगोंदा येथील टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू, हमाल गंभीर जखमी..

दिनांक २१ डिसेंबर २०२५ वाठार स्टेशन/श्रीगोंदा:

लोणंद-सातारा मार्गावर पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत एका भरधाव टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक गणेश भीमराव खोसे (वय ३४) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांच्यासोबत असलेला हमाल गंभीर जखमी झाला आहे.

मृत गणेश खोसे हे मूळचे जळगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथील रहिवासी असून, सध्या ते श्रीगोंदा तालुक्यातील बेलवडी फाटा येथे वास्तव्यास होते.

वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १९) सकाळी हा अपघात झाला. टेम्पो (क्रमांक MH 16 DP 3326) लोणंद बाजूकडून साताराच्या दिशेने भरधाव वेगात निघाला होता.

https://amzn.to/4pOZZyB

पिंपोडे खुर्द हद्दीतील ‘दोस्ती ढाबा’ जवळ असलेल्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेला टेम्पो रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन जोरदार पलटी झाला.

या अपघातात चालकाच्या केबिनचा चक्काचूर झाला, ज्यामुळे गणेश खोसे यांचा जागीच प्राण गेला. त्यांच्यासोबत असलेले हमाल सुधाकर मोतीराम गिरे (वय ४२, रा. सोनरवास, जि. वाशीम; सध्या रा. बेलवडी फाटा, ता. श्रीगोंदा) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच वाठार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सुधाकर गिरे यांनी याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गिरी करत आहेत.

स्रोत:(ऑनलाइन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading