दिनांक २६ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:
कोरोना काळात सुजय विखे यांनी विमानाने जे रेमडीसीवर इंजक्शन आणले.. त्यात पाणी भरलेले होते..! असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केला असून, असा सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
उमेदवार निलेश लंके आज श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी दिवसभरात शिवसेना ठाकरे गट, तसेच विविध असोशीयेशनचे पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला.. त्यानंतर संध्याकाळी माजी आमदार राहुल जगताप यांच्या श्रीगोंदा शहरातील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लंके यांनी विखेवर ही टीका केली आहे.
या पत्रकार परिषदेसाठी बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, अनिल ठवाळ, स्मितल भैया वाबळे, बाळासाहेब दुतारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याचबरोबर कोरोना काळात सर्वात आधी लसीकरण हे विळदघाटात सुरु झाले, तिथेसुद्धा लसीकरणाच्या नावाखाली करोडो रुपयांची विखेनी बोगस बिले काढल्याचा घणाघाती आरोप लंकेनी केलाय.
मी निवडणूक आल्यावर तयारी करणारा नाही.. मी सामान्य लोकांसाठी कायम तयार असतो.. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून १९ दिवसात ३५० गावांमध्ये मी पोहोचलो. त्या माध्यमातून मतदार संघाची भौगोलिक परिस्थिती मतदार संघातले प्रश्न समजून घेतले. ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली असून, आपला विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास निलेश लंकेंनी याठिकाणी व्यक्त केला.
विखेनी आपल्याला पारनेर मधूनच लीड मिळेल असे सांगितले.. याबाबत लंकेना विचारले असता, चार सहा डफड्यावाले हाताशी धरून, तुम्ही कस लीड मिळवणार..? मी माझ्या मतदारसंघासाठी दिवस रात्र एक केला आहे. विखेंच्या पायाखालची वाळू सरकली.! त्यामुळे ते असे वायफळ व्यक्तव्य करत असल्याचे लंकेनी मिश्किलपणे सांगितले.
तसेच एमआयएमचा एक आणि माझ्याच नावाचा डमी उमेदवार भाजपने उभा केलाय त्यांनी माझा धसका घेतल्यामुळेच ते आता डमी उमेदवार उभे करत असल्याचे लंकेनी सांगितले.
अजीत पवार यांच्याकडून पारनेर मध्ये एवढा निधी घेतला आणि त्यानंतर तुमचं आणि अजित पवार यांचं नेमक काय बिनसल..? असे पत्रकारांनी विचारले असता, अजित पवार यांच्यासारखा नेता राज्यात टिकला पाहिजे. म्हणून, त्यांच्यासोबत होतो आणि अजित दादा आणि मी कुटुंबातील आहोत. ते माझे नेते आहेत.. असे म्हणत त्यांनी या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देणे टाळले..
स्रोत:(पत्रकार परिषद)
