तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांसमवेत उमेदवार निलेश लंके यांचा संवाद मेळावा संपन्न..

दिनांक २७ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

काल श्रीगोंदा शहरातील विवीध ठिकाणी महविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी घेतलेल्या संवाद मेळाव्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे यांच्या पुढाकाराने शिवाजीनगर येथे निलेश लंके यांनी शिवसेना पदाधिकारी आणि संघटनेच्या जबाबदार कार्यकर्त्या समवेत संवाद साधत निवडणुक आणि प्रचार, प्रसार संदर्भात औपचारीक चर्चा केली.

यावेळी शिवसेना पदाधिकारी, तालुका कार्यकारिणीतील सर्वच प्रमुख पदाधिकारी, शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, उप तालुका प्रमुख, ज्यात (तालुका प्रमुख) बाळासाहेब दुतारे, (तालुका संघटक) सुरेश देशमुख, (शहर प्रमुख) संतोष खेतमाळीस, (उप तालुका प्रमुख) रावसाहेब डांगे, रघुनाथ सुर्यवंशी, सुनिल शिंदे, चंद्रकांत धोत्रे, निलेश साळुंके, शरद नागवडे, गणेश लाटे, हनुमंत लाटे, प्रकाश काळोखे, सुनिल कानगुडे, बाळासाहेब शिंदे, अविनाश दिवटे, राहुल नवले, रोहिदास म्हस्के, जमीर शेख, शिवाजी समदडे, नितिन लोखंडे, दिलिप आनंदकर, सुदाम मखरे, गणेश पालकर, संजय नेवसे, शाकाल सोले, सचिन मुंढेकर, रघुनाथ सकपाळ आदि पदाधिकारी उपस्थित होते. याठिकाणी सुभाष आनंदकर यांचा शिवबंधन बांधून लोकनेते निलेश लंके यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश संपन्न झाला.. या कार्यक्रमात लक्षणीय प्रमाणात शिवसैनिकांची उपस्थित होती.

याप्रसंगी माजी आमदार राहुलादादा जगताप, बाबासाहेब भोस, घनःश्याम शेलार, मनोहर पोटे, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर, एमडी शिंदे, भाऊसाहेब खेतमाळीस, मुकुंद सोनटक्के सह मविआचे कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

उमेदवार निलेश लंके यांनी शिवसैनिकांच्या मनातील भावना जाणुन घेत, निवडणुक प्रक्रियेतील सक्रीय सहभागाबद्धल मनोमन स्वागत केले. शिवसैनिक कोणतेही कामं जबाबदारिने आणि पूर्ण ताकतीने करतो.. या निवडणुकित मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न शिल राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  पुढे त्यांनी नमुद केले की, मिही झेंडे, दांडे, पोस्टर, बॅनर, चिकटवणारा कार्यकर्ता होतो. कामात उपाशी, तपाशी, तहान भूक हरपून कामं केलेले आहे. मीही शिवसैनिक असल्याने एका शिवसैनिकाच्या सर्व वेदना मला ज्ञात आहेत. असे ते म्हणाले. मोठया प्रवाहात कामं करीत असताना शिवसैनिक प्रसिद्धी पासून लांब असतो. मात्र, मान अपमनाला महत्व न देता, कार्य कर्तृत्वात सर्वात पुढील भूमिका तो बजावतो. अनेक दिवसांपासून शिवसैनिकांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली.. आज तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला.. आणि तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ता आणि शिवसैनिकांसोबत यथोचित चर्चा सत्र संपन्न झाले.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Vedio:पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना निलेश लंके..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading