पत्नीच्या व सासरच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या. मी आई वडिलांची सेवा करू शकत नाही.याची मला खंत वाटते.
01 mins
दिनांक २९ (येळपणे,श्रीगोंदा):
तालुक्यातील येळपणे येथील तरुण अमोल चंद्रकांत शिंदे याने आपल्या पत्नीच्या व सासरच्या त्रासाला कंटाळून आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना २३फेब्रुवारी रोजी घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,अमोल चंद्रकांत शिंदे हा सामान्य परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून आपल्या नातेवाइकांच्या मदतीने सुरत या ठिकाणी व्यवसाय करत होता. व्यवसायामुळे तो सुरत या ठिकाणी राहत असे. दीड वर्षांपूर्वी अमोलचा आढळगाव येथील दादा दत्तू मेटे यांची मुलगी काजल हिच्यासोबत विवाह झाला होता.विवाहानंतर अमोल हा त्याच्या पत्नी सोबत व्यवसायासाठी सुरत येते राहन्यास गेला.
लग्नाला काही दिवस झाल्यानंतर त्याची पत्नी काजल ही अमोलशी घरगोती कारणावरून भांडण करत असे. ती आपल्या आई, वडील,भाऊ व आत्या यांच्या सांगण्यावरून अमोलला मानसिक त्रास देत होती.अमोलचेही पत्नी काजलशी अनेक वेळा भांडण झाले होते. ज्या ज्या वेळेस भांडण झाले त्या त्या वेळेस अमोलला त्याच्या सासू सासऱ्यानी धमकावून आपल्या मुलीला घेऊन गेले होते.तसेच सासरे दादा दत्तू मेटे,सासू निर्मला दादा मेटे, मेहुणी सोनी सुदाम गायकवाड,मावळण सासू रुक्मिणी संतोष जाधव हे वेळोवेळी फोन करून व कधी प्रत्यक्षात अमोल यास शिवीगाळी व दमदाटी करत असत.
अमोल नुकताच येळपणे गावच्या यात्रेनिमित्त गावा – कडे आल्यावर आपल्या पत्नीला यात्रेसाठी माहेरहून घेऊन आला होता.तसेच २३ फेब्रुवारी रोजी सकाळी काजल हिने कुठले कारण नसताना भांडण केले.तू सुरतला राहिलास तरच मी तुझ्याबरोबर संसार करेल, अन्यथा नाही.असे म्हणत,भांडण झाल्यावर काजल ने आपले वडील दादा दत्तू मेटे यांस बोलावून घेतले व सर्वां समक्ष अमोला शिवीगाळ केली.
वाद झाल्यानंतर दादा दत्तू मेटेनी अरेरावी शिवीगाळ करत काजलला दुचाकीवरून घेऊन जात असताना अमोलला म्हणाली की,तू मेला तरी तुझ्या मैतिला सुद्धा येणार नाही. त्यानंतर काही काळात अमोलने एक चिठ्ठी लिहिली होती.त्या चिठ्ठीमध्ये पत्नी काजल,(सासरे)दादा दत्तू मेटे,(सासू)निर्मला दादा मेटे,(मेहुणी) सोनी सुदाम गायकवाड,(मावळण सासू)रुक्मिणी संतोष जाधव यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे.मी आईवडिलांची सेवा करू शकत नाही. याची मला खंत वाटते.असा मजकूर लिहून घरातील छताला फाशी घेतली.
बेलवंडी पोलीस स्टेशन येथे पत्नी काजल अमोल शिंदे,सासरा दादा दत्तू मेटे रा.आढळगाव ता.श्रीगोंदा सासू निर्मल दादा मेटे, मेहुणी सोनी सुदाम गायकवाड रा.थेरगाव ता कर्जत,मावळण रुक्मिणी संतोष जाधव रा.चोराचीवडी ता.श्रीगोंदा यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केले अशी फिर्याद मिना चंद्रकांत शिंदे यांनी दिली आहे.त्यानुसार बेलवंडी पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३०६,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,गुन्ह्याचा पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे(पोलीस निरीक्षक)अरविंद माने करत आहेत.