दिनांक ३० सप्टेंबर २०२६, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा रस्ता अडवून तिचा हात पकडणे, अश्लील वर्तन करणे आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन महिना उलटला तरी मुख्य आरोपी अजूनही मोकाटच आहे.
विशेष म्हणजे, सत्र न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला असतानाही पोलिस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने पीडित कुटुंब आणि अल्पवयीन मुलीमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून दिनांक ०५/०९/२०२६ रोजी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात BNS कलम ७४, ७८, १२६(२), ३५१(२), ३५१(३) आणि POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महेश रामदास ससाणे याच्यासह त्याचे नातेवाईक व मित्र फिर्यादीला आणि पीडित मुलीला फोन करून “प्रकरण तडजोडीने मिटवून घ्या” असा दम देत असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महेश रामदास ससाणे याच्यासह त्याचे नातेवाईक व मित्र फिर्यादीला आणि पीडित मुलीला फोन करून “प्रकरण तडजोडीने मिटवून घ्या” असा दम देत असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.
सत्र न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असला, तरी आरोपी परिसरात उजळमथ्याने फिरत असून पीडित मुलीवर व साक्षीदारांवर दबाव टाकत आहे.

आरोपी पीडित मुलीच्या शेजारीच राहत असल्यामुळे मुलीच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. Call Logs, Call Recordings, सोशल मीडिया चॅट्स इत्यादी सुरक्षित करून आरोपीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
स्रोत: (प्रसिद्धी पत्र)
