श्रीगोंद्यातील १७ खेळाडूंची विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड.१७ सुवर्ण, ७ रौप्य व १२ कांस्य पदकांसह संजय आनंदकर स्पोर्ट अकॅडमीची दमदार कामगिरी.

१७ सुवर्ण, ७ रौप्य व १२ कांस्य पदकांसह संजय आनंदकर स्पोर्ट अकॅडमीची दमदार कामगिरी.

श्रीगोंदा : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत १७ सुवर्ण, ७ रौप्य आणि १२ कांस्य अशा एकूण ३६ पदकांची कमाई केली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधून तब्बल ९६६ खेळाडूंनी या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या आणि कौशल्यपूर्ण वातावरणात झालेल्या या स्पर्धेत संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट तंत्र, वेग, शारीरिक क्षमता आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवत उल्लेखनीय यश संपादन केले.

अकॅडमीतील खेळाडू नियमित सराव, शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर स्पर्धांसाठी तयारी करीत आहेत. या यशामुळे अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या अकॅडमीच्या १७ खेळाडूंची ४ व ५ ऑक्टोबर दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी, पुणे येथे होणाऱ्या पुणे विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरावरील यशाची पुनरावृत्ती करून विभागीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी हे खेळाडू सज्ज झाले आहेत.

विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले सुवर्णपदक विजेते – ऋतिका अशोक दातीर, ज्ञानेश्वरी भरत खेडकर, गायत्री सतीश भुजबळ, प्राजक्ता राजू तरटे, शर्वरी सूर्यभान गोलांडे,यश राजेंद्र खाकाळ, विराज विठ्ठल बरबडे, अर्णव गोविंद वाघ, ओंकार बाबासाहेब ननावरे, कृष्णा माणिक खेडकर, अंकित शहाजी खामकर, प्रणव गंगाधर रायकर, नीरज राजेंद्र जैन, ऋतुराज प्रकाश थीटे, वरद किरण काळे, अमरजीत प्रवीण बळे, प्रज्वल सुनील ढवळे.

खेळाडूंच्या नियमित सराव, मेहनत, शिस्त आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याचे अकॅडमीचे प्रशिक्षक जयेश व  सिद्धेश आनंदकर यांनी सांगितले.

या दमदार कामगिरीबद्दल यशस्वी खेळाडूंचे आमदार विक्रमसिंह पाचपुते, ज्येष्ठ नेते घन:शाम अण्णा शेलार बाबासाहेब भोस, मा.आ. राहुल दादा जगताप, राजेंद्र दादा नागवडे, जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष ग्रँडमास्टर संजय आनंदकर यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply