दिनांक २३ फेब्रुवारी २०२५, काष्टी/श्रीगोंदा:
इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित विभागीय कबड्डी स्पर्धेत परिक्रमा तंत्रनिकेतन, काष्टीच्या कबड्डी संघाने शानदार कामगिरी करत घवघवीत यश मिळवले. ही स्पर्धा फॅकल्टी ऑफ पॉलिटेक्निक, अकोले येथे २७ जानेवारी रोजी पार पडली.

अंतिम सामन्यात परिक्रमा तंत्रनिकेतन (काष्टी) आणि अशोक पॉलिटेक्निक (श्रीरामपूर) यांच्यात अटीतटीची लढत झाली. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ प्रदर्शन करत सामना २०/२० गुणांनी बरोबरीत राखला. निकाल ठरवण्यासाठी दिलेल्या पाच रेडमध्ये परिक्रमा तंत्रनिकेतन संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले.

या विजयामुळे परिक्रमा तंत्रनिकेतनच्या संघाची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ही निवड संस्थेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
संस्थेच्या मान्यवरांचे अभिनंदन:
परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक व माजी नामदार बबनराव पाचपुते, अध्यक्षा डॉ.सौ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव आमदार श्री. विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते यांच्यासह अन्य मान्यवरांनी विजेत्या संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

अभिनंदन करणाऱ्या प्रमुख मान्यवरांमध्ये –
- ॲकॅडमी डायरेक्टर – सौ. इंद्रायणी पाचपुते
- मुख्य अति. कार्यकारी अधिकारी – प्रा. अनिल पुंड
- अती. अॅकॅडमी डायरेक्टर – संजीवजी कदमपाटील
- तंत्रनिकेतन प्राचार्य – डॉ. प्रशांत सूर्यवंशी
- इंजिनिअरिंग प्राचार्य – मोहन धगाटे
- एम.बी.ए. डायरेक्टर – डॉ. सुदर्शन गिरमकर
- बी.फार्मसी प्राचार्य – डॉ. सुनील निर्मळ
- डी.फार्मसी प्राचार्य – रमेश शिंदे
- सायन्स कॉलेज प्राचार्य – डॉ. पांडुरंग इथापे
मार्गदर्शकांची मोलाची साथ:
संघाच्या या यशामागे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी सर आणि शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अशोक राहिंज यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.
संघाच्या या यशामुळे परिक्रमा तंत्रनिकेतनने क्रीडा क्षेत्रात आपली ठसा उमठवली असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत संघ उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

