दिनांक २६ सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा:
नुकत्याच सोनई व श्रीगोंदा येथे झालेल्या अहिल्यानगर जिल्हा आंतर महाविद्यालयीन कुस्ती (मुले व मुली) स्पर्धेत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत महाविद्यालयाचा लौकिक वाढवला आहे.

या स्पर्धेत महाविद्यालयाच्या सहा कुस्तीगिरांनी फ्री-स्टाईल आणि ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात यश मिळवत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभागीय स्तरावर होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे.

खेळाडूचे नाव सोनाली दरेकर प्रथम, पवार कीर्ती प्रथम, देविकर कामिनी द्वितीय, पवार दत्ता प्रथम, जोएब शेख द्वितीय, कोळपे कृष्णा द्वितीय, या विजयी खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालिका कल्पना बागुल, क्रीडा शिक्षक संजय डफळ, तसेच इंटरनेशनल कुस्ती संकुल, श्रीगोंदा येथील श्री. हनुमंत फंड आणि सौ. पूजा फंड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कुस्तीगिरांच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन माजी मंत्री बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुलदादा जगताप, प्र. प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात तसेच जिमखाना विभाग प्रमुख प्रा. रमेश थोरात यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले असून, पुढील विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाविद्यालयाच्या या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
