श्रीगोंदा: ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर बाळासाहेब नाहटा यांचे स्पष्टीकरण; ‘राजकीय षडयंत्र’ असल्याचा गंभीर आरोप, पुरावा म्हणून व्हिडिओ क्लिप सादर करणार..

श्रीगोंदा, दिनांक २५ सप्टेंबर २०२५:

तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील बाळासाहेब नाहटा यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocities Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, नाहटा यांनी हे गुन्हे राजकीय द्वेष आणि वैमनस्यापोटी दाखल झाले असून ते सरासर खोटे असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आपल्या बचावासाठी त्यांनी नऊ मिनिटांची घटनास्थळाची व्हिडिओ क्लिप उपलब्ध असल्याचा दावा केला आहे.

घटनास्थळाचा video

श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी कमलाकर दादा अल्हाट (रा. लोणी व्यंकनाथ) यांनी बाळासाहेब नाहटा यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(r)(s), ३(२)(va) आणि BNS च्या ११५(२), ३५२, ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.


फिर्यादीत नमूद केल्यानुसार, लोणी ते चिंबळा रोडच्या कडेला जुन्या स्मशानभूमीजवळ झेंड्याच्या चौथऱ्याच्या कामाबाबत नियोजन करण्यासाठी समाज बांधव दत्तात्रय सोनवणे, संभाजी जावळे, सुनील जावळे, अजय सोनवणे, अनिल नेटवटे व इतर जमले होते. याच वेळी बाळासाहेब नाहटा यांनी तेथे येऊन जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केली आणि दत्तात्रय सोनवणे यांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर बाळासाहेब नाहटा यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी केलेले मुख्य दावे खालीलप्रमाणे आहेत:

  • “या तक्रारीत कसलेही तथ्य नाही. माझ्यावर राजकीय द्वेष आणि वैमनस्यापोटी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही संधी साधू लोक या लोकांना पुढे करून माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र साधण्याचा प्रयत्न करत आहेत.”
  • मागील ४० वर्षांचा रेकॉर्ड मी प्रशासनाला दाखवला असून, मला जाणूनबुजून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • नाहटा यांच्याकडे नऊ मिनिटांची घटनास्थळाची व्हिडिओ क्लिप उपलब्ध आहे, ज्यामध्ये त्यांनी कोठेही अश्लील, अर्वाच्य किंवा जातीवाचक शिवीगाळ केलेली नाही.
  • व्हिडिओ क्लिपमध्ये, “मी लोकांना समजावत असताना माझ्यावर काही लोकांनी झेंड्याची काठी तसेच टिकाऊ उभारून मलाच अश्लील अर्वाच्य भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे दिसत आहे.”
  • बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याखाली मला नमूद समाज बांधवांनी शिव्या दिल्या, असेही त्यांनी सांगितले.
  • फिर्यादी कमलाकर अल्हाट यांचे आणि आपले कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या आजारपणात मी स्वतः आर्थिक सहाय्य केले आहे.
  • बौद्ध समाज, मातंग समाज आणि लोणी गावातील मागासवर्गीय समाजाशी आपले ऋणानुबंधाचे संबंध आहेत. मी प्रत्येक सुखदुःखात दलित समाज बांधवांच्या सोबत उभा राहिलो आहे, असे त्यांनी सांगितले.
  • मी जनप्रतिनिधी आणि सरपंच पती या नात्याने मातंग समाज बांधव आणि बौद्ध समाज यांच्या प्रश्नात समन्वय साधण्यासाठी मध्यस्थी केली होती. मात्र, या घटनेचे असे राजकारण होऊन माझ्यावरच आरोप-प्रत्यारोप होतील हे मला ज्ञात नव्हते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
  • अनेक वर्षांपासून ज्या समाजाने सहकार्य आणि सद्भावना दाखवली, त्यांनीच उलट आपल्यावर गुन्हे दाखल केल्याने बाळासाहेब नाहटा यांनी अतिशय वाईट अनुभूती आल्याचे स्पष्ट केले.
  • नाहटा यांच्यावरील विश्वासामुळे त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गावकरी संतप्त झाले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून गावकरी ‘गाव बंद’ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading