श्रीगोंद्यात शिक्षकाच्या वाढदिवसाची शाळेतच धूम..! शिस्तभंगाच्या कारवाईची शक्यता..?

दिनांक २४ सप्टेंबर २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेच्या नियोजित वेळेत शिक्षकाचा वाढदिवस साजरा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा शिक्षक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यानेच त्यांच्या सहशिक्षकाचा हा वाढदिवस साजरा केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शालेय वेळेत अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्यावर जिल्हा शिक्षण अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. तरीही, या शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांसमोर केक कापून आणि फेटा बांधून वाढदिवस साजरा केला. यामुळे शिक्षण क्षेत्रात कुतूहल निर्माण झाले आहे.

या घटनेमुळे जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक आणि पालकांमध्ये चर्चा सुरू आहे. काही लोकांच्या मते, शिस्तपालन महत्त्वाचे असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे आता जिल्हा शिक्षण अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या शिक्षकांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading