दिनांक २ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी प्रवरा पब्लिक, प्रवरानगर अहमदनगर येथे पार पडल्या. या स्पर्धांमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील कु. सविता वाळके, कु. रिद्धी सप्रे आणि कु. अश्विनी हिरडे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

कु. सविता वाळके हिने १८ वर्षे वयोगटातील भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तसेच गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कु. रिद्धी सप्रे हिने १००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, तर कु. अश्विनी हिरडे हिने १००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या तीनही खेळाडूंची पुण्यातील बालेवाडी येथे १९ ते २२ सप्टेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कु. सविता वाळके आणि कु. रिद्धी सप्रे या बारावी कला शाखेत शिकत असून, कु. अश्विनी हिरडे ही FYBA मध्ये शिकत आहे. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालिका कल्पना बागुल, क्रीडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी खेळाडूंचे महाविद्यालयीन विकास समिती चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आ. राहुल जगताप, महावीर पाठवा, कॉलेजचे प्राचार्य महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, जूनियर उपप्राचार्य शहाजी मखरे, पर्यवेक्षक झिटे सर, जिमखाना प्रमुख संजय अहीवले, प्रा. सुदाम भुजबळ, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






