# काष्टी.. अवैध धंद्यांचे ‘हॉटस्पॉट’..! अनधिकृत लॉजिंग.., गुटखा गोडाऊन.., बिंगो आणि वेश्या व्यवसायांमागे कोणत्या नेत्याचा प्रताप.?”

काष्टीतील ‘अवैध’ साम्राज्य..!  स्थानिक प्रशासनाच्या नजरेआड, बड्या नेत्याचा वरदहस्त..?

श्रीगोंदा, दिनांक २५ फेब्रुवारी २०२५:

काष्टी गावात अवैध धंद्यांचे जाळे इतके घट्ट विणले गेले आहे की, स्थानिक प्रशासनाने डोळेझाक केली आहे की.. मुद्दाम दुर्लक्ष केले आहे.? असा प्रश्न आता सर्वत्र विचारला जात आहे. गावात बिनधास्तपणे चालणाऱ्या अनधिकृत लॉजिंग्स, गुटख्याच्या गोडाऊनचे साम्राज्ये, तसेच परप्रांतीय महिलांच्या माध्यमातून फोफावलेला वेश्या व्यवसाय ,.. हे सगळे कोणाच्या वरदहस्ताने चालते आहे.? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

#काष्टी… अवैध धंद्यांचे ‘हॉटस्पॉट’:
काष्टीतील विविध हॉटेल्समध्ये वेश्या व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये परप्रांतीय महिलांचा वापर होत असून, अनेक कॉलेज तरुण या जाळ्यात अडकत आहेत. या बेकायदेशीर धंद्यांना आश्रय देण्यासाठी गावात जागोजागी अनधिकृत लॉजिंग सुरू असून, हे लॉजिंग्स प्रशासनाच्या नजरेआड कसे राहिले,? हा मोठा प्रश्न आहे.

तालुक्यातील सर्वात मोठे गुटख्याचे गोडाऊन काष्टीत असल्याची माहिती मिळाली असून, या गोडाऊनच्या माध्यमातून अवैध गुटखा पुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गुटखा विक्रीवर बंदी असतानाही प्रशासनाची याकडे पाहण्याची मानसिकता का नाही?

अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, या सर्व बेकायदेशीर धंद्यांना एका बड्या राजकीय नेत्याचा पाठिंबा मिळत आहे. स्थानिक व्यावसायिकांना धंदा सुरू करण्यासाठी थेट या नेत्याशी संपर्क साधावा लागतो, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे “प्रशासन केवळ नावापुरते आहे का?” असा प्रश्न निर्माण होतो.

काष्टीतील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक जनता या सर्व बेकायदेशीर धंद्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करत आहेत. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, या नेत्याचा पर्दाफाश कधी होणार.?

काष्टी गावाची ओळख आता अवैध धंद्यांची बाजारपेठ म्हणून होत असल्याचे दुर्दैवी वास्तव समोर येत आहे. या सर्व प्रकरणात प्रशासन, पोलीस आणि राजकारणी यांचे गूढ संबंध उघड करणे गरजेचे आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading