श्रीगोंद्यात अल्पसंख्यांक कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी.! निवृत्ती खेतमाळीस विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल..

दिनांक २८ सप्टेंबर, श्रीगोंदा:

शहरातील नामांकित शोरूमचे मालक वैभव दिलीप मेथा हे श्रीगोंदा न्यायालयाजवळ उभे असतांना, निवृत्ती आनंदराव खेतमाळीस या इसमाने गट नंबर ९३९/१ मधील बांधकाम त्वरित थांबवा. नाहीतर..! तुमचे बांधकाम jcb यंत्राने पाडून टाकीण.. म्हणत, मेथा यांना अश्लील शिवीगाळ करून, नमूद बांधकाम जर, चालू ठेवले. तर, जीवे ठार मारील.! अशी धमकी दिली आहे. यावरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिनांक २७ सप्टेंबर रोजी वैभव मेथा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निवृत्ती खेतमाळीस विरुद्ध भादवि कलम ५०४, ५०६ नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मेथा यांचे खरेदी मालकीची वडिलोपार्जित शहरातील जुना गट नंबर ९२४ व नवीन गट नंबर ९३९/१ हे क्षेत्र १६ जुलै १९८६ रोजी मेथा व इतर १ यांनी राजाराम सखाराम चाकणे यांच्याकडुन खरेदी दस्ताने अधिकृत विकत घेतलेले आहे. नमूद जागेचे वारस नोंदीने अतुल मेथा व शैला मेथा यांची नावे लागली आहेत. यापैकी शैला मेथा यांची वडाळी रोड लगतची जमीन खरेदी दस्ताने, वैभव मेथा व वैष्णवी मेथा यांनी घेतली असुन, सदर जागेच्या मोजणी हद्दीच्या खुणा उप अधीक्षक साहेब, भूमि अभिलेख, श्रीगोंदा यांनी प्रत्यक्ष पाहणी, नोंदी करून दर्शविल्या आहेत. या जागेपैकी दक्षिणेकडील १५ गुंठे क्षेत्र शेलार व इतर दोन यांचे आहे. तर, उत्तरेकडील १५ गुंठे क्षेत्र वैभव दिलीप मेथा व अतुल रायचंद मेथा या दोघांत सामाईक आहे.

वैभव मेथा यांनी त्यांच्या स्वतः मालकी जागेत व्यवसायासाठी पत्र्याच्या शेडचे बांधकाम चालू केले आहे. हे काम पूर्ण होणार, इतक्यात निवृत्ती खेतमाळीस नामक इसम दिनांक २६ सप्टेंबर २१ रोजी बेकायदा तेथे आला. हे बांधकाम बंद करा..! नाहीतर… तुमचे बांधकाम jcb यंत्राच्या सहाय्याने पाडून टाकीण.. म्हणत वैभव मेथा यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, दमबाजी करून, त्याने दहशतीचे वातावरण निर्माण केले. आणि त्या बांधकामास हरकत घेतल्याचे वैभव मेथा व अतुल मेथा यांनी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांचे नावे श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज देत वस्तुस्थिती दर्शवली आहे.

त्यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे की, निवृत्ती खेतमाळीस हा अतिशय नंगड प्रवृत्तीचा इसम असून, तो त्याच्या राजकीय प्रक्रियेचा गैरफायदा घेत, आमच्यावर दबाव आणत आहे. अर्ज प्रक्रिया करून, वेळोवेळी लोकांना त्रास देण्याचे काम तो करत असतो. त्याचे सर्व विभागात लोकांना त्रास देण्याच्या हेतूने तक्रारी व निवेदने आहेत. Minority family threatened to kill in Shrigonda! Filed an unsolved crime against a retired farmer.

निवृत्ती खेतमाळीस याचा व आमचे सदर जागेचा दुरान्वये संबंध नसतांना, केवळ या ठिकाणी जमिनीला आलेले भाव लक्षात घेता, त्याने हे कृत्य केले आहे. जर, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे मालकी किंवा हक्क दर्शविणारे कागदपत्र असतील.? तर, श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांसमोर ते सादर करावेत. असे मेथा यांनी तक्रारीत नमूद केले आहे. शिवाय आम्ही अल्पसंख्यांक समाजाचे असल्याने सदरील इसम आमच्यावर दबाव आणू पाहत असल्याचे ही मेथा कुटुंबियांचे म्हणणे आहे.

स्रोत:(दिनांक २७ सप्टेंबर २१ रोजी दाखल तक्रार)

प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

जाहिरात:

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading