दिनांक २६ सप्टेंबर, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पंचायत समितीत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी झुंबर गवांदे यांनी धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली आहे. या दुर्भाग्यपूर्ण घटनेनंतर श्रीगोंदा तालुक्यासह श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये मोठी चर्चा झाली. मूळचे तालुक्यातील मांडवगण येथील रहिवासी असलेले गवांदे यांच्याकडे वलघुड व खांडगाव या दोन गावांचा पदभार होता.

सदरील घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्री.क्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून ५० वर्षीय इसमाने उडी मारून आत्महत्या केली. दिनांक २४ सप्टेंबर २१ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रसार माध्यमांतून सदर वृत्त समजले आहे.
याबाबत पोलिसांनां माहिती मिळताच पाटोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सौताडा येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. Khandgaon / Valghud village gram sevak commits suicide ..!
धबधब्याजवळ आत्महत्या केलेल्या इसमाची बॅग सापडली. त्यात मिळालेल्या ओळख पत्रावरून नमूद व्यक्तीचे नाव झुंबर मुरलीधर गवांदे जे श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयात ग्रामसेवक आहेत. अशी प्राथमिक माहिती ओळखपत्राच्या आधारे मिळाली. यावेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने पुढील तपास सुरू केला.
स्रोत:(ऑनलाइन वृत्त)
