५० हजारांच्या लाच प्रकरणी बेलवंडी पो.स्टे.चा पोलीस हवालदार लाप्रवि युनिटच्या ताब्यात..

दिनांक २८ सप्टेंबर श्रीगोंदा:

लाप्रवी च्या अहमदनगर युनिटने पोलीसवाडी (येळपणे) ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर येथील तक्रारदाराच्या तक्रारीनुसार प्रकाश आसाराम बारवकर, वय ५६ वर्ष, धंदा: नौकरी, पोलीस हवालदार, बक्कल नंबर – ४२८, नेमणूक बेलवंडी पोलीस स्टेशन, ता- श्रीगोंदा, जि. अहमदनगर, वर्ग ३. रा- दातीर- लबडे वस्ती, बेलवंडी, ता- श्रीगोंदा, जिल्हा- अहमदनगर यानी ५०,०००/- रुपये व तडजोड अंती २२,०००/- रुपये दिनांक १७ सप्टेंबर रोजी लाचेची मागणी केली होती.

सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांना यातील आरोपी लोकसेवक यांनी त्यांचेकडे तपासासाठी असलेल्या मिसींग मध्ये मदत करुन, मिसिंग प्रकरण बंद करणेसाठी रुपये ५०,०००/- ची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी ला प्र विभागाकडे दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या तक्रारीवरून त्याच दिवशी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक यांनी पोलीस स्टेशन बेलवंडी, येथे पंचासमक्ष तक्रारदार यांचे कडे ५०,०००/- ची मागणी करून तडजोड अंती २२०००/- ची लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम स्विकारण्याची संमती दर्शवली.! म्हणून, आज दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी बेलवंडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३९८/२०२१, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे बारवकर याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लोकसेवकास ताब्यात घेण्यात आले आहे.

सापळा अधिकारी हरीष खेडकर (पोलीस उप अधीक्षक) ला.प्र.वि.अहमदनगर यांचे सापळा पथक पुष्पा निमसे, पोलीस निरीक्षक पो हवा. संतोष शिंदे, पो ना.रमेश चौधरी, विजय गंगुल, पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार हारुन शेख, पोलीस नाईक राहुल डोळसे यांनी मा.श्री सुनील कडासने सो.(पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक), मा.श्री.सतिश भामरे (प्रभारी अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक) जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. Police constable of Belwandi police station in possession of Lapravi unit in bribery case of Rs 50,000.

नमूद प्रशासनाने सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा…
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
@ टोल फ्रि क्रं. १०६४

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply