ला.प्र.वि.अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे संशयित आरोपी (भ्रष्ट्र लोकसेवका) समवेत खाजगी हॉटेलातील जेवण बनला, चर्चेचा विषय..

दिनांक २९ सप्टेंबर, श्रीगोंदा:

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेलवंडी पोलीस ठाण्यात सापळा रचून, लाच मागितल्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या भ्रष्ट लोकसेवकाला न्यायालयात हजर करण्याआगोदर शहरातील एका खाजगी हॉटेलात या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपी समवेत सार्वत्रिक केलेले जेवण श्रीगोंदयात चर्चेचा विषय बनला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, संशयित आरोपी असलेल्या बेलवंडी पो.स्टे.च्या बारवकर नामक पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून, पन्नास हजारांच्या लाच प्रकरणी ताब्यात घेतलेले आहे. काल दिनांक २८ सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईनंतर नमूद युनिटच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बारवकरला आज न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. दरम्यान जेवण करण्यासाठी पंचायत समिती समोरील एका हॉटेलमध्ये आरोपी सह पथक गेले आणि नेमके पत्रकारांनी त्याठिकाणी स्टिंग ऑपरेशन करून, सापळा लावून अटक करणाऱ्या व आज कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याला आणि सापळ्यात अडकलेल्या आरोपीला समवेत खाजगी ठिकाणी सार्वत्रिक जेवण करतांना कॅमेरात टिपले..!

आरोपीस अधिकारक्षेतत्रात ठेवून किंवा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पोलिसांच्या ताब्यात देत, जेवण देण्यास दुमत नाही. परंतु, आरोपीला बरोबर घेऊन अधिकाराचा गैरवापर करत, त्यालाही समवेत जेवण देण्यात आले. याबाबत पत्रकारांनी लाप्रवीचे अधिकारी हरीश खेडकर यांना फोनद्वारे माहिती विचारली. तर, त्याचा त्यांना राग अनावर झाला. प्रश्न विचारल्यावर पत्रकारांच्या संपादकांना भेटून, तुम्हांला (पत्रकारांना) नोटीस देणार. असेही त्यांनी दरडावले आहे.

मिसींग गुन्ह्यात मदत करुन, ते प्रकरण बंद करण्यासाठी बारवकर याने पन्नास हजार रुपयांची मागणी करत, तडजोडी अंती २२ हजार रुपये मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करून आरोपी लोकसेवकाला न्यायालयात हजर करण्याआगोदर केलेले हे जेवण श्रीगोंदयात चर्चेचा विषय बनलाय. A meal in a private hotel with the suspected accused (corrupt public servant) of LPV officials became a topic of discussion.

या प्रकरणी लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता, त्यांनी तुंम्ही कोणाशी बोलताय..! याचे भान आहे का.?मी कसाही बोलेलं..! पोलीस कर्मचाऱ्याने आणि आरोपीने जेवण करू नये का..? असे सांगत माध्यम प्रतिनिधींना अरेरावीची भाषा वापरत दमबाजी केली आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading