#श्रीगोंदा.. हल्ल्यातील गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची मागणी..!

दिनांक १ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांच्या न्यायिक लढ्यासाठी सक्रिय असणाऱ्या बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा विधानसभा युनिटने काल दिनांक ३० सप्टेंबर २१ रोजी श्रीगोंद्याचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निषेध निवेदन देत आदिवासी पारधी कुटुंबावरील हल्ल्यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व पीडित कुटुंबाला न्याय द्यावा.! अशी मागणी केली आहे.

या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पारनेर या गावी आदिवासी पारधी कुटुंबावर किरकोळ चोरीच्या संशयावरून खुनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सिद्धांत अरुण काळे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच, उपचारादरम्यान अभिमान पांढऱ्या काळे या वृद्धाचाही मृत्यू झालाय. यांचे बरोबरच इतर दहा बारा जण गंभीर जखमी झाले असून, सदरील घटना अमानवी आहे.

किरकोळ कारणावरून ही घटना घडलेली असून, आदिवासी पारधी समाजाबाबत असलेला आंतरिक राग व जातिद्वेषाची सल व्यक्त करीत, येथे लोकांनी कायदा हातात घेताला. सबंध महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती – जमातींवरील अन्याय, अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मात्र, सरकारकडून गुन्हेगारांवर कडक कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी अशा विकृत मानसिकतेच्या लोकांमार्फत दुर्दैवी दुर्घटना घडतात.

आदिवासी समाज हा अशिक्षित/आडाणी असून, त्याचा गैरफायदा घेत, अनेक लोक राजकीय लाभ उठवतात. तसेच, पीडितांची बाजू घेण्याऐवजी अशा प्रकरणांमध्ये योग्य पद्धतीने तपास न करता, आरोपींना मोठ्या शिक्षेपासून वाचवले जाते. असे बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनात ते पुढे नमूद करतात की, एकंदरीत सरकारची खराब नियती व नीतिमत्ता यामध्ये दिसून येते. सरकारने अशाप्रकारे या सर्व SC/ST समाजावर हल्ले होणार नाहीत यासाठी योग्य ती दखल घ्यायला हवी. त्याचबरोबर जमावाच्या माध्यमांतून घडणार्‍या घटनांमधील प्रकरनं जलदगती न्यायालयात चालवून हल्लेखोर नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.. असे म्हटले आहे. Shrigonda .. Demanding death penalty for the perpetrators of the attack ..!

सदरील निवेदन नायब तहसीलदार ढोले मॅडम व पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटील साहेब यांना देण्यात आले आहे. यावेळी सुनील ओहोळ (जिल्हा प्रभारी), विठ्ठल म्हस्के (विधानसभा अध्यक्ष) मोहन काळे, स्वप्निल पवार, कचरु लष्करे, सतीश भोसले, अजित भोसले, सलीमभाई आत्तार, रामसिंग भोसले, वैशाली काळे, मोहन घोलवड (उपाध्यक्ष एकलव्य संघटना, अहमदनगर) इत्यादींसह बसपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

स्त्रोत: (निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading