नागवडे कारखाना पदाधिकारी, संचालक व कामगार यांचेवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा – संदिप नागवडे…

दिनांक:२७ डिसेंबर, श्रीगोंदा:

स.म.शि.ना.नागवडे सहकारी साखर कारखाना लि. श्रीगोंदा फॅक्टरी, तालुका-श्रीगोंदा या संस्थेची निवडणूक लागलेली असताना, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ कब व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील नियम ३(III) परिपत्रकानुसार, सहकारी संस्थाचे सेवक या शीर्षकाखाली ज्या सहकारी संस्थेची निवडणुक घोषीत झाली आहे, त्या सहकारी संस्थेचे सेवक आपले दैनंदिन कामकाज सुरु ठेवतील. तथापी संस्थेचा कोणताही सेवक, त्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेणार नाहीत.

सहकारी संस्थेच्या सेवकाने निवडणुकीमध्ये व प्रचारामध्ये कोणत्याही उमेदवारासाठी अथवा पॅनेलसाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होवू नये. असा आदेश असताना देखिल स.म.शि.ना.नागवडे सहकारी साखर कारखाना लि. श्रीगोंदा फॅक्टरी, कारखाना सेवक व कारखाना अंतर्गत असलेल्या शिक्षण संस्थेतील सेवक प्रचारामध्ये शिवाजीराव नागवडे किसान क्रांती पॅनेल चा प्रचार करत आहेत. हा आचार संहितेचा भंग आहे.

तरी त्यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्यात यावा. अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष संदिप नागवडे यांनी केली आहे. तसेच, विश्रामगृहाच्या वापराबाबत आचारसंहिता परिपत्रकानुसार संस्थेच्या संचालक मंडळाने आचारसंहिता कालावधीत आचारसंहिता लागू असलेल्या कार्यक्षेत्रात अथवा कार्यक्षेत्राबाहेर संस्थेच्या खर्चाने दौरे करू नयेत, संस्थेच्या विश्रामगृहाचा वापर संचालकास, उमेदवारास अथवा इतर कोणासही आचारसंहिता कालवधीत करता येणार नाही.

तसेच, सहकारी संस्थेची वाहने व कर्मचारीवर्ग यांचा निवडणुकीच्या कामकाजासाठी विद्यमान पदाधिकारी व संचालकांनी कोणत्याही परिस्थितीत वापर करू नये. या नियमाचेही विद्यमान पदाधिकारी व संचालक यांचेकडून उल्लंघन होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून तात्काळ चौकशी करून, आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे संदीप नागवडे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी, स.म.शि.ना.नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा फॅक्टरी तहसील कार्यालय, श्रीगोंदा. यांचेकडे केली आहे.

कारवाई न केल्यास सर्व पुरावे कोर्टात सादर केले जातील. यामध्ये कर्मचार्यांच्या नोकऱ्या गेल्यास त्यास सर्वस्वी कामगार व शिक्षण संस्थेतील सेवकच जबाबदार राहतील असा इशारा नागवडे यांनी दिला आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading