हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नागरिकांना बसण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बाकड्यांचे लोकार्पन..

दिनांक १५ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा शहरातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शहर वाचनालयासमोर नागरिकांना बसण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष श्रीगोंदा यांच्या वतीने बाकडे टाकण्यात आले.

या बाकड्यांचा लोकार्पण सोहळ दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता शिवसेना उपनेते मा. श्री. साजन भैय्या पाचपुते यांच्या मातोश्री सुनंदा(काकी) पाचपुते यांच्या हस्ते संपन्न झाला.

शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे यांनी आपल्या स्व:खर्चातून सदर बाकडे दिल्याबद्दल सुनंदा(काकी) पाचपुते यांनी बाळासाहेब दुतारे यांचे कौतुक केले. राजकारण डोळ्यासमोर ठेवून अनेक कार्यकर्ते स्वतःच्या प्रभागांमध्ये वार्डामध्ये काम करीत असतात. पण, बाळासाहेब दुतारे यांनी स्वतःचा प्रभाग सोडून शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये जनतेला बसण्यासाठी बाकडी टाकण्यात आले.

या कार्यक्रमाला शहर प्रमुख संतोष खेतमाळीस, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा अध्यक्ष निलेश गायकवाड, सचिन घोडके, भीमा घोडके, सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी सुरेश देशमुख, भाऊसाहेब गोरे, दिलीप आनंदकर, निलेश साळुंखे रावसाहेब डांगे, सागर खेडकर, जमीर शेख, चंद्रकांत धोत्रे, झहीर जकाते, ओमकार शिंदे, बाबासाहेब चोरमले, शरद नागवडे, नूतन पानसरे, जनाबाई गायकवाड, नितिन लोखंडे, संदीप शिंदे, सचिन मुंडेकरी, सुनील घोडके, दिलीप पोटे, हरिभाऊ काळे, रोहिदास मस्के, आबा रामफले, वसिम ताडे, गोपाळ डांगे, संजू बनसोडे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा तालुका पदाधिकारी व तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

स्त्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply