दिनांक २८ सप्टेंबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव या ठिकाणी १६ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ५ जुगाऱ्यासह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.या घटनेला काही कालावधी उलटण्या आगोदर पुन्हा एकदा श्रीगोंदा पोलिसांनी त्याच ठिकाणी छापा टाकून ७ जुगाऱ्यासह लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ५ जुगाऱ्यांसह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या घटनेला काही कालावधी उलटतोय तोच पुन्हा भानगावात जुगार अड्डा चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप याचे एका पथक तयार करून भानगाव या ठिकाणी छापा मारला.
२७ सप्टेंबर रोजी २:३० वाजनेचे सुमारास भानगाव शिवारात, धनगरवस्ती जवळ एका पत्र्याचे उघडे शेडमध्ये तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना ७ जण आढळून आले.त्यामध्ये अनिल मधुकर लगड वय ४५ वर्षे, रा.उक्कडगाव, ता.श्रीगोंदा, रवि गोविंद पाठक वय ३२ वर्षे रा.वार्ड नं.७ श्रीरामपुर ता. श्रीरामपुर, जावेद गुलाब बेपारी वय ५० वर्षे, रा.खाटीकगल्ली श्रीगोंदा ता.श्रीगोंदा, आयुब महमद शेख वय ५० वर्षे, रा.श्रीगोंदा ता.श्रीगोंदा, स्वप्निल प्रविण पितळे वय २५ वर्षे, रा.उक्कडगाव, ता.श्रीगोंदा, बाळु आप्पा नवले वय ३७ वर्षे, रा.टाकळी कडेवळीत ता.श्रीगोंदा सुरेश पंढरीनाथ गोरे वय ४६ वर्षे, रा.भानगाव ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर हे तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले.
त्यांचेकडून २,८२,६००/- रोख रक्कम ६६,१०० मोबाईल ४१,५००,व चार मोटार सायकल १,७५,०००/- रुपये रोख व तिरट नावाचे जुगार खेळण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे करत आहेत.
स्रोत:(दादा सोनवणे यांनी दिलेली माहिती व दाखल तक्रार)
