दिनांक ८ एप्रिल २०२४, अहमदनगर/श्रीगोंदा:
तालुक्यातील दलित समाजातील युवक सनी सुडगे याचा खून झालेबाबत त्याच्या कुटूंबाने व आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी निवेदन देऊन, स्थानिक पोलीस प्रशासनाकडे न्याय मिळण्याची मागणी केली होती. परंतु, न्याय मिळाला नाही म्हुणून पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर दिनांक ७ रोजी आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात (उत्तर) जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे (दक्षिण), श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, यांच्या मागदर्शना खाली आमरण उपोषण सुरू केले.
राजाभाऊ जगताप म्हणाले की सदरील घटना ही नितीन आगे खर्डा प्रकरणा सारखीच आहे, मयत तरुणाची आत्महत्या केल्याचा बनाव रचला असून, ती आत्महत्या नसून खूनच आहे. मयत तरुणाच्या अंगावर जखमा असून, त्या तरुणाचे पूर्ण पाय खाली टेकलेले आहेत. घटनेच्या ठिकाणी पूर्ण गोष्टी संशयास्पद आहेत. याबाबत उच्चस्तरीय चौकशी किंवा सीआयडी तर्फे तपास करण्यात यावा. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी दया गजभिये, नितीन भैलूमे, आकाश साळवे, सदाभाऊ भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, युवराज पाखरे, प्रवीण सुडगे(भाऊ), रत्नमाला सुडगे (आई), विजय सुडगे (चुलते), संजय सुडगे (चुलते), संदीप सुडगे, मारुती सुडगे, सतीश शिंदे, शरद गोरेसह अनेक आरपीआयचे पदाअधिकारी उपस्थित होते..
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
