पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यात ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम साजरा….

अहिल्यानगर, दि. १७:

शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२६ अंतर्गत आज ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय, जलपुनर्भरण अभियान’ हा उपक्रम अहिल्यानगर मध्यम प्रकल्प विभाग कार्यालय व सिंचन भवन परिसरात उत्साहात राबविण्यात आला.

सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत पार पडलेल्या या मोहिमेची सुरुवात कार्यकारी अभियंता ज. म. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

या पंधरवाड्याचा कालावधी दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ असा असून जलसंपदा विभागाच्या नियोजनानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत कार्यालय परिसर स्वच्छ व सुस्थितीत ठेवणे व जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

अभियानादरम्यान जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यालय परिसरासह अंतर्गत विभाग व वसाहतींमध्ये स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश दिला.

कार्यकारी अभियंता यांच्या अखत्यारीतील ताजनापूर मध्यम प्रकल्प बांधकाम उपविभाग क्र. १ व २, शेवगाव तसेच राहुरी व अहिल्यानगर येथील मध्यम प्रकल्प बांधकाम उपविभागांमध्येही स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading