दिनांक २९ ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा:
राज्य राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे माजी उपाध्यक्ष निवास नाईक यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात घेतलेल्या मुलाखतीत सहभागी होऊन त्यांनी आपली इच्छाशक्ती दर्शवली होती. जागा वाटपात शिवसेनेला ही जागा मिळाल्याने नाईक यांनी मराठा आरक्षण लढाईचे नेते मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली होती. जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल प्रसंगी सिने अभिनेते विजय नवले, चांभुर्डीचे चेअरमन बाबुराव ढगे, दानेश सय्यद, जितेंद्र पाडळे, माजी सरपंच संपत उदार, उपसरपंच संतोष ढगे, बन्सी आढाव, श्रीधर नाईक, जयसिंग वाळके सर, संकेत ढगे, दत्तात्रय नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
निवास नाईक यांनी ग्रामीण भागातील विकासाला गती देण्यासाठी एमआयडीसी, साकळाई योजना, डिंबे-माणिक डोह बोगदा, विसापुर तलाव शेजारील आणि खालील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या विकासाचा निर्धार व्यक्त केला.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)




